देवल-खाडीलकरांपासून मराठी नाटक आणि रंगभूमी समाजाभिमुख आणि विचाराभिमुख राहूनदेखील ‘मराठी नाट्याभिरूची’ मात्र वैचारिकतेशी फटकूनच राहिलेली दिसते!

वैचारिकता हे एक मूल्य मानणाऱ्या काही नाटककारांनी आणि त्यांच्या नाटकांनी त्या त्या काळात अल्प प्रमाणातील का होईना ‘नाट्याभिरूची’ समृद्ध, संस्कारित केलेली आहे. ही अभिरूची तात्कालिकापेक्षा मूलभूत स्वरूपाच्या जीवनानुभवाची / नाट्यानुभवाची मागणी करणारी आहे. आणि म्हणूनच ती, संस्कृती संवर्धनाचा आग्रहही धरणारी आहे. हीच आजच्या विषण्ण, उदास आणि चिंतीत करणाऱ्या ‘नाटकीय’ वर्तमानात एक दिलासाजनक बाब आहे.......